बिनाअंड्याचा रवा केक

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जानेवारी २००८

बिनाअंड्याचा रवा केक

बिनाअंड्याचा रवा केक - [Eggless Rava Cake] रवा, दूध, दही तसेच ड्राय फ़ॄट्स घालून तयार केलेला अंड्याशिवायचा शाकाहारी केक वाढदिवसाला किंवा मधल्या वेळेत मुलांना खायला देता येईल.

जिन्नस


 • दीड वाटी रवा
 • १ वाटी दूध
 • १ वाटी दही
 • १ वाटी साखर
 • ४ वेलदोडे (पूड)
 • ४ काजू (पातळ काप)
 • १० बेदाणे
 • ८-१० चारोळ्या (ऐच्छिक)
 • अर्धा चमचा बेकिंग सोडा
 • १ वाटी लोणी किंवा तूप
 • २-३ थेंब केशर एसेन्स किंवा रंग
 • पाव चमचा मीठ.

पाककृती


दही व साखर मिसळून घ्यावे. साखर विरघळली की नंतर त्यात दूध, रवा, वेलचीपूड, चारोळी, मीठ, लोणी, रंग व सोडा क्रमाने घालून चांगले मिसळावे.

तासभर झाकून ठेवावे. नंतर तुपाचा पातळ हात सारवलेल्या भांड्यात मिश्रण ओतावे.

मध्यम गरम ओव्हनमध्ये अर्धा तास हा केक भाजावा. गार झाल्यानंतर खा.