सोपा चिकन पुलाव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जानेवारी २०१८

सोपा चिकन पुलाव प्रकार | Easy Chicken Pulao

चिकन पुलावची सोप्पी पाककृती - [Easy Chicken Pulao Recipe] भुकेच्या वेळी झटपट करता येणारा मांसाहारी भाताचा पदार्थ म्हणजे सोपा चिकन पुलाव, दुपारी किंवा रात्रीच्या जेवणात हा पदार्थ केला जाऊ शकतो.

जिन्नस


  • २ - ३ कप बासमती तांदूळ
  • २ टे. स्पून दही
  • २५० ग्रॅ. चिकन
  • २ टे. स्पून आलं - लसूण पेस्ट
  • गरजेनुसार तेल
  • १ टे. स्पून गरम मसाला
  • १ टे. स्पून बिर्याणी मसाला
  • २ बारीक चिरलेला कांदा
  • १ टोमॅटो
  • मूठभर कोथिंबीर
  • मूठभर पुदिना
  • लाल मिरची पावडर
  • हळद
  • १ टे. स्पून तूप
  • १ हिरवी मिरची
  • १ मोठी वेलची
  • ३ कप पाणी
  • १ तेजपत्ता
  • बडिशेप

पाककृती


  • प्रथम तांदूळ धुवून घ्या आणि २० - २५ मिनीटे भिजत ठेवा. नंतर त्यातील सर्व पाणी काढून टाका.
  • अर्धी आलं - लसूण पेस्ट, दही, मीठ, हळद, गरम मसाला, बारीक चिरलेला पुदीना व कोथिंबीर, तेल घेवून चिकनला लावून मेरिनेट करायला ठेवून द्या.
  • कांदा लालसर, कुरकुरीत तळून घ्या व त्यातील अर्धा कांदा मेरिनेट मध्ये टाका.
  • प्रेशर कुकरमध्ये तेल व टोमॅटो परतून मऊसर करा व त्यात उरलेला तळलेला कांदा व बडिशेप टाका.
  • आता उरलेली आलं - लसूण पेस्ट टाकून परता. त्यामध्ये मेरिनेट केलेले चिकन टाकून परतून घ्या. त्यानंतर बिर्याणी मसाला टाकून व्यवस्थित परतून घ्या.
  • आता त्यामध्ये तांदूळ मिक्स करा व परतून घ्या.