दुधी भोपळ्याचा पराठा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जानेवारी २००८

दुधी भोपळ्याचा पराठा

दुधी भोपळ्याचा पराठा - [Dudhi Bhopala Paratha] दुधी भोपळा पौष्टिक असतो पण त्याची भाजी खायला आवडत नसल्याने त्याचा चटपटीत पराठा बनवून न्याहारीला, मधल्या वेळेत किंवा मुलांना डब्यात देता येतो.

जिन्नस


  • ३०० ग्रॅम दुधी भोपळा
  • ३ वाट्या कणीक
  • १ चमचा तिखट
  • १/२ चमचा हळद
  • १ चमचा मीठ
  • २ चमचे धणे-जीरे पूड
  • १ चमचा गरम मसाला
  • ४ चमचे डालडयाचे मोहन

पाककृती


भोपळा किसुन घ्यावा. पाणी पिळून बाजूला काढून ठेवावा.

नंतर सर्व एकत्र करुन पीठ भिजवावे. पीठ घट्ट असावे.

जरुर वाटल्यास भोपळ्याचेच काढलेले पाणी वापरावे.

नंतर त्याचे फुलक्याएवढे परोठे करुन दोन्ही बाजूने शेकावेत व नंतर बाजूने तूप सोडावे.