डिंक लाडू

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० जानेवारी २०१८

डिंक लाडू प्रकार | Dink Ladoo

डिंक लाडूची पाककृती - [Dink Ladoo Recipe] खासकरून थंडीच्या दिवसात बनवला जाणारा डिंकाचा लाडू हा पौष्टिक पदार्थ सर्वांनी आवर्जून खाल्ला पाहिजे.

जिन्नस


 • १/२ किलो बारीक डिंक (चकचकीत स्वच्छ वाटाण्यासारखा)
 • १/२ किलो खारीक
 • पाव किलो अळीव
 • पाव किलो खसखस
 • पाव किलो सुकं खोबरे
 • १ किलो गुळ
 • साजुक तुप
 • १/२ पाव बदाम पावडर
 • २ चमचे वेलची पावडर
 • २ चमचे जायफळ पावडर

सारणाची पाककृती


 • डिंक फुलून येइपर्यंत तूपात तळून घ्या.
 • खसखस भाजून घ्या.
 • अळीव थोड्या तुपात भाजावा.
 • खारीक भाजून घ्यावी.
 • सुके खोबरे भाजावे. नंतर तळलेला डिंक थोडा जाडसर कुटून घ्यावा.
 • खमंगपणा येण्यासाठी खसखस मिक्सरवर वाटून घ्यावी.
 • खारीक सुद्धा मिक्सरवर वाटून घ्यावी(पीठ करू नये). आता हे सर्व मिश्रण एकत्र करुन घ्यावे.
 • त्यात बदाम पावडर, वेलची पावडर, जायफळ पावडर घालावी व मिश्रण हातानेच बारीक करावे.

लाडू करण्याची पाककृती


 • लाडू करतेवेळी जेवढे मिश्रण असेल त्याचा निम्मा गूळ घेवून त्याचा गोळीबंद पाक करावा. पाक पक्का गोळीबंद करावा.
 • पाक खाली उतरवून त्यात तयार केलेले मिश्रण(सारण) ओतावे व चांगले मिक्स करावे आणि भराभर लाडू वळून घ्यावेत.
 • लाडूवर चांदीचा वर्क अथवा काजू व बदाम लावावा.
 • डिंकाचा लाडू फारच पौष्टिक असतो.