MarathiMati.com - Android App on Google Play Store

धणे-जिरे कसाय

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जानेवारी २००८

धणे-जिरे कसाय

उष्णता तसेच पित्तासाठी धणे जिरे कसाय (Dhane Jire Kasay Recipes) एक चांगला उपाय आहे.

जिन्नस


  • १०० ग्रॅम धणे
  • ५० ग्रॅम जिरे
  • २ कप दूध
  • ८ चमचे साखर

पाककृती


धणे व जिरे वेगवेगळे थोडेसे भाजून घ्यावेत. धणे-जिरे एकत्र करून मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्यावी. ही दळलेली पूड कसायकरिता वापरावी.

कसाय :

एका भांड्यात २ कप पाणी व २ कप दूध घेऊन ते एकत्र करून गरम करावयास ठेवावे. त्यात ८ चमचे साखर घालावी व चार चमचे धणे-जिरे पूड घालून हे मिश्रण उकळी येईपर्यंत तापवावे. थंड अथवा गरम सर्व्ह करावे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store