Download MarathiMati.com's New Android App from Google Play

देशी कैरीचे लोणचे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जानेवारी २००८

देशी कैरीचे लोणचे

देशी कैरीच्या लोणच्याचे (Deshi Kairiche Lonache) नाव ऎकुनच तोंडाला पाणी सुटते.

जिन्नस


  • ५ कि. कैरी
  • २५० ग्रा. शोप
  • १०० हळद
  • २५ ग्रा. लाल मिरची
  • २५० ग्रा. मीठ
  • ५० ग्रा. कलौजी
  • २५० ग्रा. मेथी
  • १ लि. मोहरी तेल

पाककृती


देशी कैरी घेवुन त्यास १ दिवस पाण्यात भिजवाव्या आता त्या पाण्यातून काढुन चांगल्या तर्‍हेने पुसून सुकवून घ्यावा या नंतर अडकित्ता घेऊन त्याने कैरीचे चार किंवा आठ आठ खाप बनवाव्या. त्यांच्या कोयी काढुन टाकाव्या.

शोप बारीक (अर्धवट कुटलेली) करावी, मेथी व कलौजी साफ करून घ्यावी. हळद, मिरची व मीठ वाटुन घ्यावे.

सर्व मसाल्यात मिळवाव्या आणि त्यास चिनी मातीच्या किंवा मातीच्या भांड्यात भरून उन्हात ठेवावे १०-१५ दिवसात हे तयार होईल.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play