खजूर सफरचंदाचे लोणचे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ जानेवारी २००८

खजूर सफरचंदाचे लोणचे

खजूर सफरचंदाचे लोणचे - [Date Apple Pickle] खजूर आणि सफरचंद दिवसातून एक तरी खावे असे म्हटले जाते त्यासाठी गोड - तिखट असे खजूर सफरचंदाचे लोणचे घरी तयार करता येईल.

जिन्नस


  • ५०० ग्रॅम आंबटसर सफरचंदे
  • २५० ग्रॅम बिनबियांचा खजूर
  • ५०० ग्रॅम साखर
  • २ मोठे चमचे तिखट
  • २ मोठे चमचे मीठ
  • १ वाटी किंवा कप व्हिनेगर

पाककृती


सफरचंदाच्या मधला भाग व बिया काढून पातळ तुकडे करावे. साल काढू नये.

५ मिनिटे चाळणीवर तुकडे वाफवावे व गार होऊ द्यावे.

खजुराचे बारीक तुकडे चिरावे. साखरेत व्हिनेगर घालून जाडासर पाक करावा.

त्यात तिखट, मीठ, सफरचंद व खजूर घालून ढवळावे.

मिश्रण मंद आंचेवर ५-७ मिनिटे उकळू द्यावे. खाली उतरवून गार करावे.

स्वच्छ बरणीत भरून ठेवावे.

पोळी, पुरी किंवा ब्रेड सॅंडविचेसमध्ये चांगले लागते.