Download MarathiMati.com's New Android App from Google Play

दशमी पुरी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जानेवारी २००८

दशमी पुरी

दशमी पुरी - [Dashami Puri] दुधात मळलेली ‘दशमी पूरी’ ही प्रवासात नेता येण्यासाठी योग्य आहेच शिवाय घरात पाहुण्यांना पूरीचा नवीन प्रकार म्हणून खायला देवून वाहवा मिळवता येईल आणि न्याहारी व मधल्या वेळेत करुन खाता येईल.

जिन्नस


  • १ किलो पीठ
  • १/२ लीटर दूध
  • १/४ चमचे मीठ
  • १०० ग्रा. साखर
  • ५० ग्रा. खसखस
  • १०० ग्रा. तूप किंवा तेल मोहना साठी
  • तळण्यासाठी वेगळे

पाककृती


दुधात साखर आणि थोडेसे पाणी मिळवून इतके गरम करवे की साखर विरघळावी आणि दूध फक्त कोमट रहावे. आता पिठात खसखस, मीठ आणि मोहन चांगल्या तर्‍हेने मिळवावे आणि दुधाच्या मिश्रणाने खुप कडक मळावे.

ओल्या कापडात अर्धा तास झाकावे. पुरी बनवते वेळी परत चांगले मळावे ज्यामुळे नरम होईल छोटी छोटी गोळी बनवून पुरी लाटावी. गरम तुपात किंवा तेलात तळावी.

ह्या दशमी पुर्‍या प्रवासात जाण्यासाठी उपयोगी आहेतच शिवाय घरी येणार्‍या पाहुण्यांना वाढण्यासाठीही मनमोहक आहेत. प्रवासात जात असाल तर थोड्या वेळ थंड करण्यासाठी ठेवून केळीच्या पानात पॅक कराव्या. बरेच दिवस पुर्‍या मुलायम आणि स्वादिष्ट राहून प्रवासात आपल्याला साथ देत राहतील.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play