MarathiMati.com - Android App on Google Play Store

दही भेंडी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जानेवारी २००८

दही भेंडी

चवीला वेगळी अशी चटपटीत दही भेंडी (Dahi Bhendi) सर्वांना आवडेल.

जिन्नस


 • १०० ग्रॅम भेंडी
 • १ कप दही
 • पाव चमचा चाट मसाला
 • पाऊण चमचा साखर
 • मीठ
 • १-२ हिरव्या मिरच्या
 • हिंग
 • पाव चमचा मोहरी
 • ५-६ कडीपत्ता पाने
 • फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल
 • भेंडी तळण्यासाठी तेल

पाककृती


भेंडी धुवून कापडाने कोरडी करुन घावीत. मग त्याचे मध्यम लांबीचे तुकडे करा.

कढईत तेल गरम करावे आणि भेंडी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घावीत

बाउलमध्ये दही घोटून घ्यावे. त्यात मीठ, साखर आणि चाट मसाला घालून नीट ढवळून घ्यावा.

फोडणीच्या कढईत तेल गरम करावे.तेल कडकडीत तापले कि मोहरी घालावी.

मोहरी तडतडली कि हिरवी मिरची, कढीपता आणि हिंग घालून दह्याला फोडणी द्यावी.

खायला द्यायच्या वेळेला तळलेली भेंडी दह्यात घालून एकत्र करुन खायला द्यावे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store