दाबेली मसाला

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जानेवारी २००८

दाबेली मसाला

दाबेली मसाला - [Dabeli Masala] ताजा, घरच्या घरी बनवलेला ‘दाबेली मसाला’ दाबेलीची चव वाढवतो.

जिन्नस


  • २-३ लाल-सुक्या मिरच्या
  • २-३ दालचिनीच्या काड्या
  • ३-४ लवंगा
  • १ /२ चमचा धणे
  • १/२ चमचा बडीशेप
  • १/२ चमचा काळीमिरी
  • १ चक्रीफुल
  • १ तमालपत्र

पाककृती


सर्व साहित्य एकत्र करुन कोरडंच भाजावे.

थंड करुन मिक्सरमध्ये वाटून बारीक पावडर करावी.

दाबेली बनवताना त्यात हा मसाला टाकावा आणि दावेलीची चव वाढवावी.