मक्याची कोफ्ता करी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २००८

मक्याची कोफ्ता करी

मक्याची कोफ्ता करी - [Corn Kofta Curry] पंजाबी स्वादाची आणि ग्रेव्ही युक्त ‘मक्याची कोफ्ता करी’ रोजच्या जेवणासाठी किंवा घरगुती छोट्याश्या समारंभासाठी साजेशी अशी अत्यंत चविष्ट आणि खमंग पाककृती आहे.

जिन्नस


 • ६ मक्याची कणसे
 • १०० ग्रॅम बेसन
 • १५० ग्रॅम बटाटे
 • १/२ वाटी दही
 • चिमूटभर सोडा
 • १/२ चमचा मिरपूड
 • १/२ चमचा जिरे
 • १/२ चमचा गरम मसाला
 • १/२ चमचा तिखट
 • ५-६ हिरव्या मिरच्या बारिक चिरलेल्या
 • हळद
 • मीठ

ग्रेव्ही साहित्य

 • १ कांदा
 • २ मोठे टोमॅटो
 • ४-५ लसणीच्या पाकळ्या
 • १ आल्याचा तुकडा
 • १ चमचा गरम मसाला
 • हळद
 • मीठ
 • तिखट

पाककृती


मक्याची कणसे किसून घ्यावी. नंतर तो किस कुकरमध्ये वाफेवर शिजवून घ्यावा.

बटाटे उकडून, सोलून घ्यावेत. नंतर सर्व वस्तू एकत्र करुन छोटे छोटे गोळे करावेत व तळून बाजूला ठेवावेत. ज

जास्त तेलावर कांदा परतून घ्यावा. त्यावर वाटलेले आले व लसूण परतावा. नंतर हळद, तिखट व गरम मसाला घालून परतावे.

पाण्याचा शिपका मारावा. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो व मीठ घालावे. जरा परतावे.

ताचे पाणी घालून रस दाटसर वाटाला, की कोफ्ते घालून उतरावे.

कोफ्ते घातल्यावर उकळू नये.

नंतर वरुन कोथिंबीर घालून सजवावे आणि गरमागरम पोळी किंवा रोटीसोबत खाण्यास द्यावे.