कोल्ड टी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ जानेवारी २००८

कोल्ड टी

कोल्ड टी - [Cold Tea] चहा पावडर, हिरव्या व काळ्या द्राक्षाचा रस आणि बर्फ घालून बनवलेली ‘कोल्ड टी’ उन्हाळ्यातील अत्यंत आरोग्यवर्धक असं थंडपेय आहे.

जिन्नस


  • दोन लहान चमचे चहा पावडर
  • ५० ग्रॅम हिरवी द्राक्षे
  • ५० ग्रॅम काळी द्राक्षे
  • ४ मोठे चमचे साखर
  • १०-१२ बर्फाचे खडे

पाककृती


तीन ग्लास पाण्यात चहा पावडर उकळवून घ्यावी.

मग गॅस बंद करून उकळलेला चहा झाकून ठेवावा. काही वेळाने गाळून त्यात साखर घालून थंड करावा.

दोन्ही द्राक्षांचा रस काढून तो चहात मिसळावा.

जितक्या प्रमाणात थंड हवे त्या प्रमाणात त्यात बर्फ घाला व कोल्ड टी पिण्यास तयार…..!