कोकोनट सरबत

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जानेवारी २००८

कोकोनट सरबत

सर्वगुणसंपन्न असलेल्या नारळाचे कोकोनट सरबत (Coconut Sarbat) हे उष्णता आणि थकवा घालविणारे उन्हाळ्यातील अत्यंत आरोग्यवर्धक तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त पेय आहे.

जिन्नस


  • एका शहाळ्याचे पाणी
  • २ बाटल्या सिट्रा
  • साखर
  • मीठ
  • लिंबाचा रस
  • बर्फाचा चुरा

पाककृती


शहाळ्याचे पाणी, २-३ चमचे लिंबाचा रस, चवीप्रमाणे साखर, मीठ व बर्फ घालून हे सर्व मिक्सरमधून फिरवून घ्यावे. प्यायला देताना या मिश्रणात सिट्रा घालून द्यावे.