MarathiMati.com - Android App on Google Play Store

कोकोनट बिस्कीटे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जानेवारी २००८

कोकोनट बिस्कीटे

कोकोनट बिस्कीटे - [Coconut Biscuit] मैदा, लोणी व सुके खोबरे घालून तयार केलेली खुसखुशीत खोबर्‍याच्या चवीची कोकोनट बिस्कीटे चहाबरोवर तसेच मुलांना मधल्या वेळेत किंवा डब्यामध्ये बिस्किटांवर जाम किंवा चीज लावून खायला देता येईल.

जिन्नस


  • १ वाटी मैदा
  • १ वाटी लोणी किंवा डालडा
  • पाऊण वाटी पिठीसाखर
  • १ चमचा व्हॅनिला
  • अर्धा चमचा खायचा सोडा
  • ५० ग्रॅम सुक्या खोबर्‍याचा कीस
  • थोडे दूध

पाककृती


तूप व साखर एकत्र करुन फेसावे. नंतर त्यात मैदा, व्हॅनिला, खोबर्‍याचा कीस (थोडा वगळून) मिसळावे. सोडा घालावा. आवश्यक तेवढे दूध घालून पुरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवावे.

त्याची जाड पोळी लाटून गोल बिस्किटे कापावी. खोबर्‍याच्या किसात एका बाजूने बुडवून ट्रे मध्ये लावून गरम ओव्हनमध्ये भाजावीत.

MarathiMati.com - Android App on Google Play Store