MarathiMati.com - Android App on Google Play Store

चुरमुर्‍यांचे पापड

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २००८

चुरमुर्‍यांचे पापड

चुरमुर्‍यांचे पापड - [Churmuryanche Papad] जेवणामध्ये पापडाचे एक वेगळे स्थान असल्यामुळे तसेच एक वेगळी चव म्हणुन ‘चुरमुर्‍यांचे पापड’ करु शकता.

जिन्नस


  • चुरमुरे
  • बेताची हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • धणे
  • जिरेपूड
  • चवीनुसार मीठ
  • लसूण
  • आले

पाककृती


तीन तास चुरमुरे पाण्यात भिजत घालावे.

त्यानंतर ते गाळून त्यात हिरवी मिरची, लसूण-आलं यांची पेस्ट घालावी.

बेताची धणे-जिरे पूड, चवीनुसार मीठ घालून कुरमुरे कणकेप्रमाणे मळावे.

चांगला गोळा करून घ्यावा. नंतर लहान लिंबाएवढे गोळे करून प्लास्टिकवर गोळा ठेवून लाटा व उन्हात वाळवा.

MarathiMati.com - Android App on Google Play Store