चुरमुर्यांचे पापड
Churmuryanche Papad
साहित्य:
- चुरमुरे
- बेताची हिरवी मिरची
- कोथिंबीर
- धणे
- जिरेपूड
- चवीनुसार मीठ
- लसूण
- आले
कृती:
तीन तास चुरमुरे पाण्यात भिजत घालावे. त्यानंतर ते गाळून त्यात हिरवी मिरची, लसूण-आलं यांची पेस्ट घालावी. बेताची धणे-जिरे पूड, चवीनुसार मीठ घालून चुरमुरे कणकेप्रमाणे मळावे. चांगला गोळा करून घ्यावा. नंतर लहान लिंबाएवढे गोळे करून प्लास्टिकवर गोळा ठेवून लाटा व उन्हात वाळवा.







