चुरमुर्‍यांचा खमंग चिवडा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २००८

चुरमुर्‍यांचा खमंग चिवडा

चुरमुर्‍यांचा खमंग चिवडा - [Churmuryancha Khamang Chivda] खुसखुशीत आणि खमंग चुरमुर्‍याचा चिवडा घरच्या घरी तयार..!

जिन्नस


  • २ शेर चुरमुरे (मापी)
  • पावशेर चणे (मापी)
  • पावशेर खारे दाणे (मापी)
  • पावशेर तळलेली डाळ (मापी)
  • १ चमचा मीठ
  • १ चमचा तिखट
  • चमचा साखर
  • १ चमचा मेतकूट
  • थोडा कढिलिंब
  • २ डाव तेल.

पाककृती


तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करा.

त्यात कढिलिंब घालून परता.

त्यावर चुरमुरे घालून परता.

त्यावर तिखट, मीठ, साखर व मेतकूट घालून परता.

त्यावर चणे, दाणे व डाळ घाला. जरा परता व उतरवा.

चुरमुरे विकत घेताना नेहमी मापाचा भावातच मिळतात.