चॉकलेट केक

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २००८

चॉकलेट केक

चॉकलेट केक (Chocolate Cake) थंड झाल्यावर त्यावर चॉकलेट बटर आइसिंग करुन स्वाद वाढतो.

जिन्नस


  • दीड कप मैदा
  • अर्धा कप कोको पावडर
  • एक कप पीठी साखर
  • २ अंडी
  • १/२ चमचा खायचा सोडा
  • १ कप ताजे दही
  • अर्धा कप वितळलेले लोणी
  • एक लहान चमचा व्हॅनिला इसेंस

पाककृती


मैदा गाळून त्यात कोको पावडर व खायचा सोडा मिसळा.

लोणी व अंड्याध्ये साखर घालून फेटा. त्यात दही मिसळा.

आता यात मैदा थोडा-थोडा घालून मिसळत रहा. आता यात थोडेसे पाणी व एसेंस टाकून लाकडी चमच्याने हलवा.

आता केक पॉट मध्ये तूप लावून मैदा लावा.

मिश्रण पॉट मध्ये भरून ओव्हन मध्ये ३५० डिग्री फे. वर बेक करावे.

केक थंड झाल्यावर त्यावर चॉकलेट बटर आइसिंग करावे.