Download MarathiMati.com's New Android App from Google Play

चायनीज गाजर-काकडीची कोशिंबीर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ जानेवारी २००८

चायनीज गाजर-काकडीची कोशिंबीर | Chinese Gajar-Kakadi Koshimbir

चायनीज गाजर-काकडीची कोशिंबीर - [Chinese Gajar-Kakadi Koshimbir] चायनीज पद्धतीची गाजर-काकडीची कोशिंबीर, चायनीज पद्धतीच्या पदार्थांची आवड असल्यास आपल्याला कोशिंबीरीचा हा प्रकार नक्कीच आवडेल, रूची पालट म्हणून एकवेळ नक्की करून पहावा.

जिन्नस


  • २ मध्यम काकड्या
  • १ अननस चकती
  • १ चमचा मीठ
  • १ चमचा सोया सॉस
  • १ चमचा व्हिनेगर
  • १ चमचा साखर
  • १ चमचा रिफाइंड तेल

पाककृती


काकड्या सोलून व गाजरे खरवडून त्याचे १ इंच लांब व एक अष्टमांश इंच रुंद अशा कापट्या चिरण्याचा प्रयत्न करावा. ओ उमल्यास लहान पातळ तुकडे करावे. त्यावर मीठ शिंपडून बाजूला ठेवावे. एका उथळ प्लेटमध्ये किंवा छोट्या सुबक ट्रेमध्ये निम्म्या काकडीच्या कापट्या ओळीने मांडाव्या. तशाच गाजराच्या कापट्या (निम्म्या) मांडाव्या.

उरलेल्या कापट्या पहिल्या ओळीवर मांडाव्या व आडव्या ओळीत रचाव्या. ओ भांडे फ्रीजमध्ये ठेवावे. एका वाडग्यात साखर, व्हिनीगर, सोया सॉस व तेल मिसलून सॉस तयार करावे. असल्यास चमूटभर अजिनोमोटो घालावे. नसल्यास चिमूटभर साधे मीठ घालावे. सॉसही फ्रीजमध्ये ठेवावे. वाढण्यापूर्वी हे सॉस कोथिंबीरीवर ओतावे व अननसाचे तुकडे वरून घालून सजवावे.कापट्या चिरंगे जमले नाही तर नेहमीसारखे कोशिंबीर व जमले तर चायनीज सॅलड !

Download MarathiMati.com's New Android App from Google Play