चिंचेचे सरबत

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ जानेवारी २००८

चिंचेचे सरबत

‘क’ जीवनसत्वयुक्त चिंचेचे सरबत (Chincheche Sarbat) हे उष्णता आणि थकवा घालविणारे आरोग्यवर्धक असे पेय आहे.

जिन्नस


  • अर्धी वाटी चिंच
  • २ वाट्या चिरलेला पिवळा गुळ
  • १ चमचा जीरे पावडर
  • मीठ

पाककृती


चिंच रात्री भिजत घालून सकाळी कोळून व गाळून घ्यावी.

त्यात गूळ मिसळून फ्रिजमध्ये ठेवावी.

सरबत देताना ग्लासमध्ये थोडेसे मिश्रण गार पाण्यात घालावे.

चवीप्रमाणे मीठ व जिरे पूड घालावी.