चिंचेचे सरबत
Chincheche Sarbat
साहित्य :
- अर्धी वाटी चिंच
- २ वाट्या चिरलेला पिवळा गुळ
- १ चमचा जिरे पावडर
- मीठ
कृती :
चिंच रात्री भिजत घालून सकाळी कोळून व गाळून घ्यावी. त्यात गूळ मिसळून फ्रिजमध्ये ठेवावी. सरबत देताना ग्लासमध्ये थोडेसे मिश्रण गार पाण्यात घालावे. चवीप्रमाणे मीठ व जिरे पूड घालावी.







