पाककला | Maharashtrian Recipes

चीजची बिस्कीटे

Cheesechi Biscuits

साहित्य :
  • १०० ग्रॅम मैदा
  • ५० ग्रॅम लोणी
  • २५ ग्रॅम चीज
  • अर्धा चमचा बेकिंग पावडर
  • २ चिमट्या लाल तिखट (ऐच्छिक)

कृती :

चीज किसून घ्यावा. लोणी हाताने फेसावे. त्यात चीज व मैदा मिसळावा. चांगले मिसळले की त्यात बेकींग पावडर व तिखट घालावे. पीठ दहा मिनिटे झाकून ठेवावे. पिठाची पाव इंच जाडीची पोळी लाटावी. लाटण्यापूर्वी थोडा मैदा पोळपाटावर भुरभुरावा म्हणजे पोळी चिकटणार नाही. साचा असल्यास त्याचा वापर करावा व लहान बिस्कीटे कापावी किंवा सुरीने चौकोनी तुकडे करावे. तुपाचा हात फिरवलेल्या ट्रेमध्ये ही बिस्कीटे मांडावी व मध्य्म आंचेवर सुमारे पंधरा मिनिटे ओव्हनमध्ये भाजावी.

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony