MarathiMati.com - Android App on Google Play Store

चीजची बिस्कीटे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ जानेवारी २००८

चीजची बिस्कीटे

चीजची बिस्कीटे - [Cheese Biscuit] मैदा, लोणी व चीज घालून तयार केलेली खुसखुशीत, खमंग अशी चीजची बिस्कीटे मुलांना मधल्या वेळेत किंवा डब्यामध्ये खायला देता येईल.

जिन्नस


  • १०० ग्रॅम मैदा
  • ५० ग्रॅम लोणी
  • २५ ग्रॅम चीज
  • अर्धा चमचा बेकिंग पावडर
  • चिमट्या लाल तिखट (ऐच्छिक).

पाककृती


चीज किसून घ्यावा. लोणी हाताने फेसावे. त्यात चीज व मैदा मिसळावा.

चांगले मिसळले की त्यात बेकींग पावडर व तिखट घालावे. पीठ दहा मिनिटे झाकून ठेवावे.

पिठाची पाव इंच जाडीची पोळी लाटावी. लाटण्यापूर्वी थोडा मैदा पोळपाटावर भुरभुरावा. म्हणजे पोळी चिकटणार नाही.

साचा असल्यास त्याचा वापर करावा व लहान बिस्कीटे कापावी किंवा सुरीने चौकोनी तुकडे करावे.

तुपाचा हात फिरवलेल्या ट्रेमध्ये ही बिस्कीटे मांडावी व कमी तापमानावर सुमारे पंधरा मिनिटे ओव्हनमध्ये भाजावी.

MarathiMati.com - Android App on Google Play Store