MarathiMati.com - Official WhatsApp Number

चीझ व भाजीचा पराठा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २००८

चीझ व भाजीचा पराठा | Cheese And Vegetable Paratha

चीझ व भाजीचा पराठा - [Cheese And Vegetable Paratha] चीझ आणि वेगवेगळ्या भाज्या किंवा तुम्हाला आवडतील त्या भाज्या घालून चटपटीत असा चीझ व भाजीचा पराठा डब्यात किंवा न्याहारी, मधल्या वेळेत करता येईल.

जिन्नस


  • १ कप मैदा
  • १ कप कणीक
  • ६ टे. स्पून डालडाचे मोहन
  • १/४ कप किसलेले चीझ
  • १ लहानसा फ्लॉवर
  • १ गाजर
  • १ वाटी मटारचे दाणे
  • १ कांदा
  • ३/४ हिरव्या मिरच्या
  • लहानसा आल्याचा तुकडा
  • २/४ लसूण पाकळ्या
  • थोडा पुदिना
  • कोथिंबीर

पाककृती


सर्व भाज्या किसुन घ्या. मटारचे दाणे व भाज्या थोडे मीठ घातलेल्या पाण्यात वाफवून घ्याव्यात. नंतर सर्व मिश्रण घोटून घ्यावे. पाणी अजिबात राहू देऊ नये.

नंतर त्यात मीठ, मिरच्या, आले, लसूण, पूदिना वगैरे घालून मिश्रण ढवळावे, चीझही घालावे. नंतर मिश्रण थंड होऊ द्यावे.

पिठात थोडे मीठ व मोहन घालून पोळ्यांच्या कणकेसारखी कणीक भिजवावी.

फुलक्याच्या आकाराच्या दोन पोळ्या करुन, मधे सारण पसरुन, कातण्याने कापून परोठे शेकावे. बाजूने तूप सोडावे.

उलटताना फार जपून व बेताने उलटावेत. हे परोठे चवीला फारच सुंदर लागतात.

Book Home in Konkan