Download MarathiMati.com's New Android App from Google Play

चण्याचे सॅलड

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८

चण्याचे सॅलेड | Chanyache Salad

चण्याचे सॅलेड - [Chanyache Salad] रूची पालट म्हणून काबुली चणे घालुन केलेले हे काहीसे वेगळ्या प्रकारचे सॅलेड अत्यंत रूचकर आणि चटपटीत लागते, अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यापर्यन्त सर्वांनाच नक्की आवडेल.

जिन्नस


  • २ वाट्या शिजवलेले चणे (काबुली)
  • अर्धी वाटी कोथिंबीर
  • अर्धी वाटी टोमॅटो
  • अर्धी वाटी काकडी (कोचवलेली)
  • २ मोठे चमचे व्हिनेगर
  • २ लिंबे (रस)
  • २ चमचे तेल
  • २-३ लसूण पाकळ्या
  • पाव चमचा मोहरीची ताजी पुड
  • चवीनुसार मीठ व मिरपूड

पाककृती


२ वाट्या काबुली चणे आदल्या रात्री भिजत घालावेत.

दुसऱ्या दिवशी सकाळी निथळून पाणी व मीठ घालून शिजवावेत.

कोथिंबीर, टोमॅटो, काकडी व लसूण बारीक चिरावी (लसूण नसला तरी चालेल).

एका मोठ्या भांड्यात सर्व पदार्थ एकत्र करावेत व अलगद हालवावे.

परदेशात शिजलेले काबुली चणे डबाबंद मिळतात. हे डबे वापरण्यास सोयीस्कर आहेत.

आपल्याकडे छोले हा एकच प्रकार चण्याचा केला जातो.

बदल म्हणून हे सॅलड करून पहा. आवडीनुसार हिरवी मिरची बारीक चिरून वापरावी.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play