MarathiMati.com - Official WhatsApp Number

चण्याचे गोळे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जानेवारी २००८

चण्याचे गोळे | Chanyache Gole

चण्याचे गोळे - [Chanyache Gole] चणाडाळ व उडीद डाळीचे गोळे करुन उन्हात कडक वाळल्यानंतर त्याची सुंदरशी आमटी बनवता येईल.

जिन्नस


  • २५० ग्रॅम चणाडाळ
  • २५० ग्रॅम उडीद डाळ
  • एक टी. स्पून धणे-जिरे पावडर
  • एक टी. स्पून हिंग
  • एक टी. स्पून लसूण पेस्ट
  • दोन टी. स्पून मिरची पेस्ट
  • दोन टी. स्पून प्रत्येकी पुदिना व कोथिंबीर पेस्ट
  • दोन टी. स्पून मीठ.

पाककृती


दोन्ही डाळी रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये वाटाव्या. (एकदम बारीक करू नयेत.)

त्यात वरील सर्व साहित्य घालून चांगले एकत्र करून कडक उन्हात प्लॅस्टिकवर बारीक बारीक गोळे करून वाळत घालावेत.

कडकडीत सुकल्यावर आवश्यकतेप्रमाणे आमटीत घालावे.

Book Home in Konkan