चहाचा मसाला

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जानेवारी २०१८

चहाचा मसाला प्रकार | Chahacha Masala

चहाचा मसाला पाककृती - [Chahacha Masala Recipe] एक उत्तम आणि उत्कृष्ट चहा बनविण्यामागे प्रत्येकाच्या ‘चहा मसाल्याचे’ एक गुपीत असतेच असते. शिवाय असा चहा आरोग्यास लाभकारी देखील असतो. आपल्याला असा मसालेदार चहा थंडी किंवा पावसाळी दिवसात अधिक हवा हवासा वाटतो.

जिन्नस


 • १५० ग्रॅम सुंठ
 • ५० ग्रॅम काळे मिरे
 • २५ ग्रॅम लवंग
 • २५ ग्रॅम दालचिनी
 • ५० ग्रॅम हिरवे वेलदोडे
 • १ जायफळ

पाककृती


 • प्रथम वरील सर्व साहित्य निवडून घ्या.
 • सर्व साहित्य हलकेसे भाजून घ्या.
 • भाजून झाल्यावर बाजूला थंड करायला ठेवा.
 • थंड झाल्यानंतर मिक्सरवर बारीक पूड करुन घ्या.
 • तयार चहा मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.