Download MarathiMati.com's New Android App from Google Play

केक पुडिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८

केक पुडिंग

केक पुडिंग - [Cake Pudding] केक, दूध, टुटी फ्रुटी, सुका मेवा असे पदार्थ एकत्र करुन केलेला गोड पदार्थ म्हणजे केक पुडिंग हे डेझर्ड म्हणुन खाता येईल.

जिन्नस


  • ६ वाटी केक
  • २ वाट्या दूध
  • चवीनुसार साखर
  • २ चमचे कस्टर्ड पावडर

सजवण्यासाठी

  • टुटी फ्रुटी
  • सुका मेवा
  • चेरी

पाककृती


एका चपट्या डब्यात केक कुस्करुन घ्या.

दुधात कस्टर्ड पावडर आणि साखर घाला. ते मिश्रण केकमध्ये मिक्स करा.

टुटी फ्रुटी, सुका मेवा, चेरीने सजवा.

नंतर डब्याला घट्ट झाकण लावून डीप फ्रिजमध्ये दोन ते अडीच तास सेट करण्यास ठेवा.

नंतर सुरीने वड्या पाडून सर्व्ह करा.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play