Download MarathiMati.com's New Android App from Google Play

केक डोनट

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ जानेवारी २००८

केक डोनट

केक डोनट - [Cake Donut] अत्यंत खमंग, खुसखुशीत ‘केक डोनट’ चहा किंवा दुधा बरोबर खल्ला जाऊ शकणारा बेकिंग प्रकारातील एक गोड पदार्थ आहे, बेकिंग आणि बेकरी पदार्थ आपणांस आवडत असल्यास हा पदार्थ आपल्याला नक्की आवडेल.

जिन्नस


  • ३ वाट्या मैदा
  • १ वाटी पिठीसाखर
  • २ टे. चमचा घट्ट वनस्पती तूप
  • १ चमचा थोडी शीग लावून बेकींग पावडर
  • २ टे. चमचा दूध
  • १ अंडे
  • अर्धा चमचा मीठ
  • १ जायफळाचा छोटा तुकडा
  • ४ दालचिनीच्या काड्या
  • ४-५ वेलदोडे.

पाककृती


जायफळ, दालचिनी व वेलदोडे यांची पूड करा.

वनस्पती तूप फेटुन घ्या. त्यात साखर घालून फेटा. नंतर त्यात अंडे घालून फेटा. त्यात मैदा, मीठ व वेलची पूड घाला.

नंतर जरुरीप्रमाणे दूध घालून पुरीसाठी पीठ भिजवतो तसे भिजवा व जाडसर पोळी लाटून डोनट-कटरने कापा व बेताच्या विस्तवावर तळा.

तळताना कढईत तूप भरपूर असावे. अंडे घातलेले असल्यामुळे कढईत पुरी टाकली की थोडा फेस आल्यासारखे होते.

त्यावर तुम्ही आयसिंग वगैरे करुन डोनट सजवू शकता तसेच कोको पावडर टाकून चॉकलेट केक डोनट ही बनवू शकता.

जे लोक अंडी खात नाहीत त्यांनी अंडे न घालता बेकींग पावडर जरा जास्त घालून करावे.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play