ब्रेडचे गुलाब जामून

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ जानेवारी २००८

ब्रेडचे गुलाब जामून

ब्रेडचे गुलाब जामून - [Breadche Gulab Jamun] ब्रेड, दूध घालून तयार केलेले एक नविन प्रकारचे ब्रेडचे गुलाब जामून वेगळी चव म्हणून खाता येईल.

जिन्नस


  • १०-१२ स्लाइस ब्रेड
  • १/२ वाटी दूध
  • १ वाटी पाणी
  • पाऊणे दोन वाट्या साखर
  • वेलची पूड
  • तळण्यासाठी तेल

पाककृती


ब्रेडच्या स्लाइसच्या कडा काढून घ्या. ब्रेड कुस्करा.

त्यामध्ये थोडेसे दूध घालून ब्रेड मळून घ्या.

नंतर साखर व पाणी एकत्र करुन साखर विरघळेपर्यंत उकळी आणा आणि पाक तयार करुन घ्या.

नंतर मळलेल्या ब्रेडचे छोटे छोटे गोळे करुन मंद आचेवर तळून घ्या.

गरमागरम गोळे पाकात घाला.

तयार आहेत ब्रेडचे गुलाब जामून.