MarathiMati.com - Android App on Google Play Store

ब्रेडची भजी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ जानेवारी २००८

ब्रेडची भजी | Bread Pakora

ब्रेडची भजी - [Bread Pakora] बेसन, तिखट एकत्र करुन त्यात ब्रेड बुडवून तळलेली ब्रेडची भजी चटपटीत, कुरकुरीत मधल्या वेळेत किंवा मुलांना डब्यात देता येईल.

जिन्नस


  • ब्रेड
  • बेसन
  • लाल तिखट
  • हिंग
  • हळद
  • चिरलेली कोथिंबीर
  • मीठ

पाककृती


प्रथम एका भांड्यात बेसन घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ, तिखट, हळद, हिंग व चिरलेली कोथिंबीर घालावी.

त्यात पाणी घालावे. मात्र पीठ जाडसर राहील, याची काळजी घ्यावी.

नंतर ब्रेडचे त्रिकोणी तुकडे कापून त्या पिठामध्ये बुडवावे व तळून घ्यावे.

चटणी किंवा सॉससोबत खाण्यास द्यावी.

MarathiMati.com - Android App on Google Play Store