ब्रेड पकोडे
Bread Pakode
साहित्यः
- ८ ब्रेड पीस
- २५० ग्रा. उकळलेल्या बटाट्याची पिट्टी
- १/२ चमचे गरम मसाला
- १ चमचा साबुत मसाला
- १/२ काळी मिरची
- १ जुडी कापलेली कोथिंबीर
- १/२ चमचे अनारदाना
- १ चमचा लाल मिरची
- कापलेली हिरवी मिरची
- १ तुकडा कापलेले आले
- तळणासाठी तेल
- चवीनुसार मीठ
पिट्ठी मध्ये मीठासहित सर्व सामग्री चांगल्या तर्हेने मिळवावी. ब्रेडचे त्रिकोणी तुकडे आणि दोन तुकड्यांच्या मध्ये मसालेदार पिट्ठी भरावी. एका भांड्यात बेसनास घट्ट भिजवावे त्यात एक चुटकी मिरची, चवीनुसार मीठ आणि चुटकी भर खाण्याचा सोडा बऱ्यापैकी मिळवावे. कढईत तेल गरम करावे आणि पिट्ठी भरून त्रिकोनी स्लाइसला बेसनात डुबवून तळावे. सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर नाष्ट्यास गरम गरम वाढावे.







