ब्रेड पकोडे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २००८

ब्रेड पकोडे

ब्रेड पकोडे - [Bread Pakoda] ‘ब्रेड पकोडे’ हा बेसन व बटाट्याच्या पिट्टीपासून बनलेला चटपटीत पदार्थ जो न्याहारी किंवा मधल्या वेळेत खाता येईल.

जिन्नस


 • ८ ब्रेड पीस
 • बेसन
 • २५० ग्रा. उकळलेल्या बटाट्याची पिट्टी
 • १/२ चमचे गरम मसाला
 • १ चमचा साबुत मसाला
 • १/२ काळी मिरची
 • १ जुडी कापलेली कोथिंबीर
 • १/२ चमचे अनारदाना
 • १ चमचा लाल मिरची
 • कापलेली हिरवी मिरची
 • १ तुकडा कापलेले आले
 • तळणासाठी तेल
 • चवीनुसार मीठ

पाककृती


पिट्ठी मध्ये मीठा सहित सर्व सामग्री चांगल्या तऱ्हेने मिळवावी. ब्रेड चे त्रिकोणी तुकडे आणि दोन तुकड्यांच्या मध्ये मसालेदार पिट्ठी भरावी.

एका भांड्यात बेसनास घट्ट भिजवावे त्यात एक चुटकी मिरची, चवीनुसार मीठ आणि चुटकी भर खाण्याचा सोडा बऱ्या पैकी मिळवावे. कढईत तेल गरम करावे आणि पिट्ठी भरून त्रिकोनी स्लाइसला बेसनात डुबवून तळावे.

सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर नाष्ट्यास गरम गरम वाढावे.