MarathiMati.com - Android App on Google Play Store

ब्रेडची कचोरी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ जानेवारी २००८

ब्रेडची कचोरी | Bread Kachori

ब्रेडची कचोरी - [Bread Kachori] नेहमीच्या कचोरीपेक्षा चवीला वेगळी व झटपट घरी बनवता येणारी ‘ब्रेडची कचोरी’ सर्वांना तसेच लहान मुलांना नाश्त्यामध्ये व मधल्या वेळेत खायला आवडेल.

जिन्नस


  • स्लाईस ब्रेड
  • १ नारळ
  • १ १/२ कप साखर
  • ७-८ वेलदोडे
  • १/२ चमचा रोझ इसेन्स
  • थोडासा बेदाणा

पाककृती


नारळ खवून साखर घालून त्याचे सारण तयार करुन घ्यावे व साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे.

त्यात वेलची पूड, बेदाणा व रोझ इसेन्स घालून गार होऊ द्यावे.

ब्रेडच्या स्लाईसच्या कडा सुरीने काढून टाकाव्यात. नंतर एकेक स्लाईस पाण्यात टाकून हाताने दाबून पाणी काढून टाकावे.

नंतर वरील सारण १ चमचा घेवून ब्रेडच्या स्लाईसवर ठेवून हाताने सर्व कडा जवळ आणून कचोरीसारखा गोल आकार द्यावा.

अशा सर्व कचोर्‍या तयार करुन ताटात ठेवाव्यात व अगदी आयत्या वेळी तळाव्यात.

फार सुंदर लागतात.

MarathiMati.com - Android App on Google Play Store