भेळ पोहे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ जानेवारी २००८

भेळ पोहे

भेळ पोहे - [Bhel Pohe]नेहमीच्या पोह्यामध्ये बदल म्हणजे चटपटीत, भेळेसारखे लागणारे भेळ पोहे मुलं आवडीने खातील.

जिन्नस


  • ५-६ वाट्या पातळ पोहे
  • १२५ ग्रॅम खारे शेंगदाणे
  • ५० ग्रॅम शेव
  • ३-४ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • अर्धे लिंबू
  • २ मध्यम कांदे
  • थोडी कोथिंबीर
  • खोबरे
  • साखर
  • मीठ

पाककृती


तुपाची हिंग-जिरे घालून फोडणी करावी. (हळद घालू नये.)

नंतर त्यात पोहे घालून मंदाग्नीवर परतावेत.

चांगले कुरकुरीत झाले की उतरावेत.

कांदा बारीक चिरावा. नंतर सर्व एकत्र करुन भेळेसारखे कालवावे.

ही भेळ चवीला अतिशय सुंदर लागते.

चुरमुरे न मिळाल्यास पोहे वापरुन भेळ करावी.