पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

भरली टोमॅटो

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जानेवारी २००८

भरली टोमॅटो

भरली टोमॅटो - [Bharli Tomato] भरली भेंडी, भरली वांगी किंवा भरलेली शिमला मिरची आपल्या परिचयाचे आणि आवडीचे पदार्थ आहेत त्याच प्रमाणे भरल्या मसाल्याच्या भाजीच्या प्रकारातील भरली टोमॅटो आपल्याला नक्की आवडेल. रूचकर, जेवणाची चव वाढवणारा आणि भाकरी, चपाती किंवा गुजराती फुलक्या सोबत रोजच्या जेवणातील रूची पालट म्हणून आपण हा पदार्थ नक्की करून पाहावा.

जिन्नस


 • १/२ कप दही
 • ५ टोमॅटो
 • ५० ग्रॅ. वाटाणे
 • २ मोठी चमचे टोस्टचा चुरा
 • १ मोठे चमचे लोणी
 • २ उकडलेले बटाटे
 • कापलेला कांदा
 • मीठ
 • मिरची
 • धणे
 • हळद
 • हिरवी मिरची
 • कोथिंबीर
 • जीरे
 • गरम मसाला

पाककृती


बटाट्यामध्ये पनीर, हिरवी मिरची, कोथींबीर, उकडलेले वाटाणे, टोस्ट चूरा, लोणी, मीठ मिरची, चांगल्या रीतीने एकत्र करावे व टोमॅटोच्या आतमध्ये भरावे.

कढईत तेल टाकून जीरे, कापलेली मिरची, कांदा टाकून लाल करावे. त्यानंतर यात टोमॅटो भरण्याआधी टोमॅटोच्या आतील काढलेला भाग एकत्र करावा व दही टाकून भाजावे.

आता भरलेली टोमॅटो यात सोडून पाणी टाकून झाकावे. गरम झाल्यावर कोथिंबीर, क्रीम, गरम मसाला टाकावा.

Book Home in Konkan