Download MarathiMati.com's New Android App from Google Play

भरलेली शिमला मिरची

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ जानेवारी २००८

भरलेली शिमला मिरची

भरलेली शिमला मिरची - [Bharaleli Shimala Mirchi] उग्र वासामुळे बर्‍याचदा शिमला मिरचीचे पदार्थ आपणांस नकोसे वाटतात, मात्र भरलेली शिमला मिरची मध्ये बटाटे, टोमॅटो आणि तुप यामुळे एक खमंग स्वाद आपल्याला मिळतो आणि नावडती शिमला मिरची आवडती होऊन जाते, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात हा पदार्थ एकवेळ नक्की करून पाहावा.

जिन्नस


  • शिमला मिरची
  • ३ उकडलेले बटाटे
  • अर्धा कप वाटाणे
  • एक टोमॅटो
  • सुके मसाले
  • तूप इच्छेनुसार
  • कांदा

पाककृती


शिमला मिरची पोकळ करून पाण्यात उकळवून घ्यावी. उकळल्यानंतर शिमला मिरची उलटी ठेवावी म्हणजे पाणी निघून जाईल.

आता एका कढईत एक पळी तूप टाकून जिरे भाजावे. दिड चमचा मीठ, २ चमचे धणे, एक चमचा हळद, १/२ चमचा तिखट, २ चमचे खटाई टाकुन भाजावे.

उकळलेले बटाटे व उकळलेले वाटाणे टाकुन हलवावे. टोमॅटो टाकावे व चांगल्या तर्‍हेने फेटावे मिश्रण बिलकुल सुके झाले पाहिजे.

आता शिमला मिरचीत हे मिश्रण चांगल्या तर्‍हेने दाबून दाबून भरावे.

आता एक कढईत तूपात शिमला मिरची तळावी. पाहिजे तर ओव्हन मध्ये बेक करावी.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play