पाककला | Maharashtrian Recipes

भाजीभात | Rice Recipes

साहित्य :

२ वाट्या तांदूळ, २ वाट्या कांदा, बटाटा, कोबी, भोपळीमिरची, तोंडली, वांगी इत्यादींपैकी मिश्र फोडी, अर्धी वाटी मोड आलेले मूग किंवा मटकी, पाव वाटी भिजवलेले शेंगदाणे, ४ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, ६ चमचे तेल, २ चमचे मीठ ( किंवा जास्त), २ चमचे साखर, ४ चमचे धने-जिरेपूड, २ डहाळे कढीलिंब, ४ चमचे लिंबाचा रस, फोडणीचे साहित्य.

 

कृती :

तांदूळ धुवून तासभर निथळत ठेवावे. निम्मे खोबरे, कोथिंबीर व लिंबूरस वरून सजावटीसाठी वगळून ठेवावा. कुकरमध्ये मावेल अशा मोठ्या पातेल्यात तेल तापले की मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून हिरव्या मिरच्या फोडणीस टाकाव्या. त्या ९ वाट्या गरम पाणी घालावे. त्यात मीठ, धनेजिरेपूड, कढीलिंब, साखर घालावी. पाण्याला उकळी आली की त्यात दाणे, भाजी, मूग व तांदूळ वैरावे व खिचडी ढवळावी. दोन मिनिटे ठेवावे. ५-७ उकळ्या आल्या की नंतर पातेले कुकरमध्ये ठेवावे. झाकणी ठेवून अर्धा तास शिजत ठेवावी. नंतर उघडून पुन्हा उलथण्याच्या टोकाने खालीवर करावी. बाहेर काढून पुन्हा मंद चुलीवर एक वाफ येऊ द्यावी. खाली उतरवून त्यावर लिंबूरस शिंपडून ढवळावे. वाढायच्या भांड्यात काढून त्यावर खोबरे व कोथिंबीर घालावी.

भात मऊ वाटल्यास वरून चमचाभर साजूक तूप घालावे. म्हणजे शिते मोकळी होतील.

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.