भाजणीचे थालिपीठ

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ जानेवारी २००८

भाजणीचे थालिपीठ

भाजणीचे थालिपीठ - [Bhajaniche Thalipit] ‘भाजणीचे थालिपीठ’ हा एक मराठमोळा महाराष्ट्रीयन, पौष्टिक, न्याहारीला किंवा मधल्या वेळेला खाऊ शकतो असा पदार्थ आहे.

जिन्नस


  • १ भांडे भाजणी
  • १ लहान कांदा
  • अर्धा चमचा मीठ
  • तिखट
  • पाव चमचा हळद
  • कोथिंबीर
  • १ पळी तेल
  • धणे-जीरे पावडर

पाककृती


भाजणीमध्ये कांदा व कोथिंबीर चिरून घालावी.

लाल तिखट, हळद, मीठ, तेल, धणे-जीरे पावडर घालून मऊसर भिजवावी.

त्याचे छोटे छोटे पुरीला करतो तेवढे गोळे करुन घावे.

प्लॅस्टिक पिशवीवर १-२ थेंब तेल टाकून हा गोळा त्याच्यावर थापावा.

तव्याला तापवून त्यावर तेल सोडून थापलेले थालिपीठ टाकावे. वाटल्यास बाजूने थोडे तेल सोडावे.

मंद गॅसवर दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजावे.

गरमागरम थालिपीठ चटणी किंवा सॉसबरोबर खाण्यास द्यावे.

टीप : कांदा घालायचा नसल्यास हिंग घालावा.