भाजणीचे थालिपीठ
Bhajaniche Thalipit
साहित्य :
- १ भांडे भाजणी
- १ लहान कांदा
- अर्धा चमचा मीठ
- तिखट
- पाव चमचा हळद
- कोथिंबीर
- १ पळी तेल
भाजणीमध्ये कांदा व कोथिंबीर चिरून घालावी. लाल तिखट, हळद, मीठ, तेल घालून मऊसर भिजवावी. तव्याला तेल लावून थालिपीठ थापावे. मंद भाजावे व उलटून पुन्हा भाजावे.
टीप : कांदा घालायचा नसल्यास हिंग घालावा.






