MarathiMati.com - Android App on Google Play Store

बटाट्याचे पुडिंग

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ५ जानेवारी २००८

बटाट्याचे पुडिंग

बटाटे, खवा, ओले खोबरे आणि केशर घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे बटाट्याचे पुडिंग (Batatyache Pudding) उपवासालाही खाता येईल.

जिन्नस


  • ५०० ग्रॅम बटाटे
  • २५० ग्रॅम साखर
  • १०० ग्रॅम खवा
  • अर्धी वाटी तूप
  • २-३ वेलदोडे पूड
  • २ चिमट्या केशर
  • १ वाटी ओले खोबरे.
  • बदाम
  • काजू

पाककृती


केशर गरम करून खलावे व थोड्या गरम पाण्यात शिजत ठेवावे. बटाटे उकडून सोलावे व गरमच असताना पुरणयंत्रात घालून बारीक करावे किंवा किसणीने किसावे.

साखरेत अर्धा वाटी पाणी घालून चुलीवर ठेवावे व दोनतारी पाक करावा.जाड बुडाच्या पातेल्यात तूप तापले की त्यावर बटाट्याचे मिश्रण परतावे.

भिजलेले केशर पाकात घालावे व पाक बटाट्यावर ओतावा. खवा मोकळा, कुस्करून घालावा मिश्रण सारखे होईपर्यंत सतत ढवळावे. खाली उतरवून सुबकशा भांड्यात घालावे. वरून वेलदोडे पूड, बदाम, काजू व असल्यास थोडे ओले खोबरे घालावे.

लहान मुलांसाठी व उपासवाल्या मंडळीसाठी एक वेगळा पदार्थ !

MarathiMati.com - Android App on Google Play Store