MarathiMati.com - Android App on Google Play Store

बटाटा वडा

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २९ जानेवारी २००८

बटाटा वडा | Batata Vada

बटाटा वडा - [Batata Vada] मुंबईच्या रस्त्यापासुन ते जगभरातल्या अनेक देशांपर्यंत पोहोचलेला मराठी माणसाच्या खाद्यसंस्कॄतीचा एक अविभाज्य भाग असणारा अस्सल मराठमोळा महाराष्ट्रीयन पदार्थ ‘बटाटा वडा’ न्याहारी म्हणून किंवा मधल्या वेळेत खाल्ला जाऊ शकतो.

जिन्नस


  • अर्धा किलो बटाटे
  • ४ हिरव्या मिरच्या
  • कढी पत्ता
  • २ चमचे मोठे कापलेली कोथींबीर
  • अर्धा चमचा मोहरी
  • पाव चमचा हिंग
  • पाव चमचा हळद
  • १ चमचा तेल
  • १ लिंबू
  • मीठ
  • १ कप बेसन
  • १/२ चमचा धणा पावडर
  • चिमुटभर सोडा
  • तळण्यासाठी तेल

पाककृती


बटाटे उकडून सोलून घ्या व कुस्करून ठेवा. आले, हिरवी मिरची, कोथिंबीर यांचे बारीक तुकडे करा.

एक चमचा तेल गरम करा. हिंग, आले व मोहरी टाका. तडतडल्यावर कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद टाका.

आता बटाटे मिसळून चांगले हलवा. थोडी साखर, लिंबू रस व मीठ टाका. चुली वरून उतरून घ्या.

थंड झाल्यावर छोटे-छोटे लाडू सारखे गोळे करा.

बेसन, धणे पावडर, एक चमचा गरम तेल व मीठ टाकून लापशी बनवा.

जाडसर लापशी तयार झाल्यावर तळण्यासाठी तेल गरम करा.

बटाट्याचे गोळे बेसनात बुडवून तेलात तळा. सोनेरी लाल झाल्यावर काढून घ्या व गरम-गरम वाढा.

खोबर्‍याची सुकी किंवा ओली चटणीसोबत चटपटीत तिखट वडापाव खाण्यास तयार...!

MarathiMati.com - Android App on Google Play Store