बदामाचा हलवा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २००८

बदामाचा हलवा

बदामाचा हलवा (Badamacha Halwa) पौष्टिक असतो.

जिन्नस


साहित्य :

  • २५० ग्रॅम बदाम
  • २५० ग्रॅम तूप
  • २५० ग्रॅम साखर
  • २ कप पाणी
  • अर्धा चमचा वेलची पावडर

पाककृती


बदाम पाण्यात ६-७ तास भिजवावे व सोलून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे. वाटतांना पाणी कमीत कमी घालावे.

एका कढईत तूप टाका व वाटलेले बदाम टाका. मंद आचेवर ठेऊन भाजा.

भाजतांना सारखे हलवत रहा. गडद ब्राऊन रंगाचा झाल्यावर आणि तूप सोडल्यावर त्यात पाणी टाकावे. सारखे हलवत रहावे.

पाणी वाढल्यावर साखर टाकावी. थोडा वेळ भाजून गॅस बंद करावा.

आता यात वेलची पावडर टाकून गरम-गरम वाढावा. हा हलवा फारच पौष्टिक असतो.