पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

बदामाची बर्फी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जानेवारी २००८

बदामाची बर्फी

बदामाची बर्फी - [Badam Burfi] व्हिटामिन ई, लोह आणि कॅल्शिअम युक्त सुकामेवा म्हणुन ओळाखला जाणारा ‘बदाम’ बुद्धी तल्लख ठेवण्यात देखील महत्वाचा मानला जातो तसेच थंडीच्या दिवसात शरीराला आवश्यक असलेली उर्जा आणि उन्हाळ्यात शरीराची अधिकची उष्णता नियंत्रणात ठेवण्याचे काम देखील ‘बदाम’ करतो. अशा पोषक आणि खमंग बदामाचा रूचकर पदार्थ म्हणजे बदामाची बर्फी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडेल, तर एकदा नक्की करून बघा.

जिन्नस


  • २५० ग्रॅम बदाम
  • २५० ग्रॅम खवा
  • अर्धा कप तूप
  • २५० ग्रॅम साखर
  • २ चांदी वर्ख

पाककृती


बदाम ६-७ तास पाण्यात भिजवून ठेवावे. नंतर त्यांना सोलून बारीक वाटून घ्यावेत.

एका कढईत खवा टाकून हलकासा भाजावा व काढून बाजूला ठेवावा.

आता कढईत तूप व वाटलेले बदाम टाकून भाजावे. भाजून तूप सुटल्यावर त्यात खवा मिसळावा व नंतर चूली वरून काढून घ्यावे.

एका वेगळ्या भांड्यात साखर व १ कप पाणी टाकून उकळावे.

घट्ट पाक झाल्यावर गॅस बंद करावा. यात बदाम खव्याचे मिश्रण मिसळावे.

एका ताटात तूप लावून हे मिश्रण पसरावे. वरून चांदी वर्ख लावावा. बर्फीच्या आकारात कापून घ्यावे.

Book Home in Konkan