MarathiMati.com - Android App on Google Play Store

आवळ्याचे लोणचे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जानेवारी २००८

आवळ्याचे लोणचे | Avalyache Lonache

आवळ्याचे लोणचे - [Avalyache Lonache] ‘क’ जीवनसत्त्व असलेल्या आवळ्याचे चटपटीत लोणचे उन्हाळ्यात अधिक फायदेशीर ठरते.

जिन्नस


  • १/२ किलो आवळा
  • १ चिमटी हिंग
  • १ लहान चमचा जीरे
  • १ मोठा चमचा बडीशेप
  • १ मोठा चमचा मोहरी
  • १/२ लहान चमचा हळद
  • १/२ लहान चमचा कांद्याच्या बीया
  • १/४ लहान चमचा ओवा
  • २ लहान चमचे गरम मसाला
  • १/२ लहान चमचा काळे मीठ
  • २ लहान चमचे साधे मीठ
  • १/२ लहान चमचा सुकलेला पुदीना
  • २ मोठे चमचे व्हीनेगर
  • २ लहान चमचे साखर
  • १ वाटी सरसों तेल

पाककृती


एका पातेल्यात आवळे, अर्धा चमचा मीठ, हळद व पाणी टाकून उकळा, आवळे थोडे कमी शिजवा, गॅस बंद करा. पाणी काढून आवळे सुकवा, जीरे, बडीशेप, मोहरी, ओवा व साखर मिक्सरमधून काढा. एका कढईत तेल गरम करा व सर्वमसाले आणि आवळे टाकून २ मिनीटे परता. आवळे गार झाल्यावर व्हीनेगर टाकून बरणीत भरा.

MarathiMati.com - Android App on Google Play Store