आवळा मुरंबा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८

आवळा मुरंबा

जीवनसत्व क, पित्तनाशक असा आवळ्याचा मुरंबा (Avala Muramba) थंड असल्यामुळे खास करुन उन्हाळ्यात किंवा रोज सकाळी एक चमचा घेतल्याने फायदा होईल.

जिन्नस


  • २ किलो आवळे
  • २ किलो साखर
  • २० ग्रा. चुना
  • १० ग्रा. छोटी वेलची
  • १० ग्रा. चांदीचा वर्क
  • १ ग्रा. केसर
  • पाणी आवश्यकतेनुसार

पाककृती


आवळ्यास जाड दाभणाने छेदावे. चुन्याचे तीन भाग करावे. एक भाग चुना पाण्यात मिळवावे आणि आवळ्यास त्यात टाकावे.

४ तासानंतर आवळ्यास चुन्याच्या पाण्यातुन काढुन ते पाणी फेकुन द्यावे आणि दुसरा भाग चुना पाण्यात टाकुन आवळे २४ तास भिजवावे नंतर याच प्रमाणे तिसरा भाग चुना पाण्यात टाकुन साखरेचा एका तारेचा पाक तयार करावा.

केसर व छोटी वेलची वाटुन त्यात मिसळावी व आवळे त्यात टाकावे. थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवावे.