MarathiMati.com - Android App on Google Play Store

आरारूटची लापशी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २००८

आरारूटची लापशी

आरारूटची लापशी - [Arrowrootchi Lapsi] अत्यंत चविष्ट, खमंग आणि पौष्टीक अशी ‘आरारूटची लापशी’ लहान मुलांपासुन ते वयस्करांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त आहे खास करून पित्ताचा त्रास होत असल्यास हा पदार्थ नक्कीच फायद्याचा ठरेल.

जिन्नस


  • १ टेबलस्पून आरारूट
  • १ १/२ कप दूध
  • २ चमचे साखर
  • २ थेंब व्हॅनिला इसेन्स

पाककृती


१/२ कप गार दूधात आरारूट घालून त्याची चांगली पेस्ट करुन घ्यावी.

नंतर १ कप दुधात साखर घालून त्याला उकळी आणावी. नंतर त्यात वरील आरारूटची पेस्ट घालून मिश्रण चांगले ढवळावे, इसेन्स घालावा.

जरा दाटसर झाले, की उतरवावे. आवडत असल्यास त्यात चिमूटभर मीठ टाकावे.

अशीच तांदुळाच्या पिठाची, बार्लीच्या पिठाची किंवा ओटच्या पिठाची लापशी करावी.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store