आलू टिक्की

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जानेवारी २०१८

आलू टिक्की प्रकार | Aloo Tikki

आलू टिक्की पाककृती - [Aloo Tikki Recipe] लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत न्याहारीत किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी चटपटीत आणि सर्वांची आवडीची अशी आलुची टिक्की.

जिन्नस


  • ४ - ५ बटाटे
  • ३ स्लाईस ब्रेड
  • २ हिरव्या मिरच्या
  • १ टी. स्पून जीरे पावडर
  • चवीनुसार मीठ
  • १ लिंबू
  • मुठभर कोथिंबीर
  • ब्रेड क्रम्ब्स
  • तळण्यासाठी तेल

पाककृती


  • बटाटे धुवून मऊसर शिजवून घ्या. नंतर त्याची सालं काढून मॅश करा.
  • ब्रेडचे स्लाईस पाण्यात बुडवून घ्या व हाताने दाबून त्यातील पाणी काढून टाका.
  • हिरवी मिरची बारीक वाटून घ्या. बटाटे, ब्रेड, मीठ, जीरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबू पिळून सर्व मिक्स करा.
  • त्याचे गोळे बनवा व हाताने दाबून सपाट करा. ब्रेड क्रम्ब्स मध्ये घोळवून तेलात तळून घ्या.
  • केचअप किंवा तिखट पुदीना चटाणीबरोबर सर्व्ह करा.