निसर्गरम्य आंबोली - सिंधुदुर्ग फोटो

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ एप्रिल २०१४

निसर्गरम्य आंबोली - सिंधुदुर्ग फोटो | Amboli - Sindhudurg Photos

निसर्गरम्य आंबोली, सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठीकाण असलेल्या निसर्गरम्य आंबोलीचे फोटो - [Photos of Amboli - Sindhudurg].

आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे.

६६४ मीटर उंचीवर असलेले आंबोली हे निसर्गरम्य ठिकाण घाटमाथ्यावर असून या परिसरामध्ये सदाहरित घनदाट जंगले पसरलेली आहेत. कोल्हापूरहून आंबोली १६० किलोमीटर आहे. या जंगलात हिरडा, आईन, जाभूळ, तमालपत्र, शिकेकाई, पिसा, आंबा असे वृक्ष आहेत. तर रानडूक्कर, ससे, गवे, बिबटे, चितळ असे अनेक प्राणी दिसतात. बुलबुल, मलबार, हॉर्नबिल(धनेश), पॅराडाइज फ्लायकॅचर असे पक्षी आढळतात.

कोल्हापूर-बेळगाव रस्त्यावर आंबोलीपासून १० किलोमीटर नांगरतास हा ७० फूट उंचीचा धबधबा आहे.

सावंतवाडीहून ३५ किलोमीटरवर आंबोली आहे. सावंतवाडी आंबोली घाटात सावंतवाडीच्या संस्थानिकाचा राजवाडा दिसतो. हिरण्यकेशी नदीच्या उगमाजवळ हिरण्यकेशीचे मंदिर व आश्रम आहे. इथेच एक गूढ गुहा असलेले ठिकाण आहे.

आंबोली परिसरात एम.टी.डी.सी. चे रेस्ट हाऊस व खाजगी हॉटेल्समध्ये रहाण्याची सोय होऊ शकते.

आंबोलीच्या पश्चिमेला महादेवगड, उत्तरेला मनोहरगड व मनसंतोषगड हे किल्ले आहेत.

मुंबई, पुणे, कोल्हापूर व बेळगांवहून आंबोलीपर्यंत एस.टी.ची सोय उपलब्ध आहे.

आंबोलीतील श्रीराम मंदिर | Shree Ram Temple at Amboli
कागदी पताकांचे झुंबर | Paper Pataka Jhumber
मंदिरातील कागदी पताकांची सजावट | Paper Pataka Decoration in Temple
कागदी पताकांची सजावट | Paper Pataka Decoration
आंबोली गाव | Amboli town
हापूस आंबा | Hapus - Alphonso Mango
रतांबा फळ - कोकम, आमसूल | Ratamba Fruit - Kokam, Amsul
बरका फणस | Barka Phanas - Jackfruit
करवंद - डोंगरची काळी मैना | Karwand - Karanda
करवंद विकणारी कोकणी स्त्री - Konkani Women Saling Karvand
शिंपले - मुळे | Shimple - Mussels
काप्या फणसाचे गर | Kapa Phanas - Jackfruit