कुसुमाग्रज | वि.वा. शिरवाडकर

लेखन गीता बोंबे | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ जुलै २०१३

कुसुमाग्रज | वि.वा. शिरवाडकर | Kusumagraj | Vishnu Vaman Shirwadkar

दिनांक २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९). कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्‍या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते.

जागतिक मराठी परिषदेच्या वतीने तसेच मराठी भाषेवर प्रेम करणार्‍या अनेक संस्था-संघटनांच्या वतीने दिनांक २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

कुसुमाग्रज | वि.वा. शिरवाडकर - संबंधित उपयुक्त लेखन/दुवे